सीतेची अग्निपरीक्षा

Sita's-Agnipariksha-in-Ramayan

This translation in Marathi has been contributed by Sister Aryabala. Original post in English is available at http://agniveer.com/sita-agnipariksha/

   रामायणातील सीतेच्या अग्निपरीक्षेबद्दल आपण इथे चर्चा करु या. असंम्हणतात की  रावणवधानंतर सीतेच्या पावित्र्यावर संशय घेऊन रामाने सीतेलापरत स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा, आपल्यापावित्र्याची साक्ष देण्याकरिता सीता अग्नीत उडी घेते आणि अग्नीदेवतिला सुखरूप बाहेर घेऊन येतात. स्वर्गातील सर्व देवता रामाला तिचंपावित्र्य पटवून देतात आणि श्रीराम तिचा स्वीकार करतात.  

    या प्रसंगाबद्दल समाजात अनेक मतं रुजलेली आहेत.परंपरावादींच्या मते समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी रामाचं हे एक योग्यकृत्य आहे. स्त्रीवादी ह्या प्रसंगाचा वापर रामायण काळातील संस्कृती आणिहिंदूधर्माला नावं ठेवण्यास करतात. स्त्री विरोधकांसाठी असलेप्रसंग स्त्रियांवर पहारे बसविण्यास कामी येतात. अन्य मतांचे प्रचारकह्याचा उपयोग हिंदूंना आपल्या मतांमध्ये खेचण्यास करतात. दलित चळवळीचेसमर्थक ह्या प्रसंगाला ब्राह्मणवादाचा एक फार्स मानतात.चमत्कारवाद्यांच्या मते रावणाने हरलेली सीता ही खरी सीता नसून तिची सावलीहोती, खरी सीता ही अग्नी देवाजवळ लपलेली असून सीतेची सावली अग्नीत जाताच, ती प्रकट झाली. 

   बोचणारा प्रसंग : रामासारखा पुरुषोत्तम असंका वागला? दुसरा पर्याय नव्हता का? हे सगळं फार गोंधळून टाकणारं आहे. खरंपाहता, अशा चमत्कारिक गोष्टी मला नेहमीच कोड्यात टाकतात. वैज्ञानिकआविष्कारांच्या आधीचा काळ म्हणजे चमत्कारांचा काळ म्हणता येईल. जो प्रसंगजितका जास्त पुरातन, तितकाच तो चमत्कारिक. पुराण असो, बायबल किंवा कुराण, त्यांचे प्रमुख प्रसंग हे चमत्कारिक  असलेच पाहिजेत. लाल समुद्र दुभंगणे, सात आकाशांची सहल एकाच रात्री, बोटांच्या इशाऱ्याने चंद्राचे दॊन तुकडे, समुद्र मंथन, सीतेचे अग्निपरीक्षण इत्यादी असे काही चमत्कार आहेतकी ज्यांना आम्ही कुणीही कधीही पाहिलेले नाही आणि कधी पाहणेही शक्य नाही.अनेक वर्षातून क्वचितच ते होतांना दिसून येतात. त्यांना निश्चित कालक्रमनसतो. 

    ह्या प्रसंगांना जर आम्ही शब्दशः न घेता त्यामागील भाव घेतले तर कदाचित आपल्या आयुष्यात त्यांचा फायदा होईल. परंतुआपणजर डोळे मिटून अशा प्रसंगांचे अनुकरण करत गेलो, तर धर्मातून आध्यात्मनिघूनच जाईल. बरीचशी मते अभ्यासल्यावर, त्यातील चमत्कारांमुळेच त्यांनामान्यता मिळालेली आढळते. अशा चमत्कारांमुळे नास्तिकांना धर्माची टिंगलउडविण्याचा आणखी एक बहाणा सापडतो. त्यांच्यासाठी मनुष्य देह हा फक्त काहीरासायनिक प्रक्रियांचाच परिणाम आहे आणि त्यामुळे आयुष्याचेत्यांचे उद्देश्य, शून्यच राह्ते.  

   सीतेचे अग्निपरीक्षण, तसं पाहिलं तर, खूप बोचणाराआणि मनाला हेलावणारा प्रसंग आहे. रामायणाचा काळ स्त्रियांनात्यांचा संपूर्ण सन्मान आणि अधिकार देणारा काळ होता. त्या काळातील स्त्रियायुद्धात सुद्धा भाग घेतांना दिसतात. खुद्द श्रीरामाची सावत्र आई कैकेयीनेराजा दशरथाला युद्धात सहाय्य केलेलं आहे. ह्या वरून दिसून येतं किश्रीरामाचा परिवार स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत औदार्य बाळगणारा परिवारहोता. श्रीराम स्वतः आपल्या आयुष्यात अशा स्त्रियांचे पुनर्वसन करतांनादिसतात, ज्यांना कुणी धोक्याने त्यांच्या पतिपासून हिरावून घेतले होते.त्यांनी सुग्रीवाला त्याच्या पत्नीस पुनः स्वीकारण्यास प्रेरित केले, जिलासुग्रीवाच्या मोठ्या भावाने, बालिने बंधक बनविलेले होते. 

   रामायणाचं संपूर्ण अवलोकन केल्यावर ह्यात कसलीच शंकाउरत नाही की श्रीराम एक अत्युत्तम आदर्श पुरुष होते. माझे प्रेरणा स्रोतश्रीकृष्ण आणि हनुमान यांबरोबरच श्रीराम ही आहेत. श्रीराम धर्माचेमूर्तिमंत स्वरूप आहेत. यामुळेच, असले प्रसंग रामाच्या चारित्र्याशी, रामायणाच्या स्वाभाविक कथेशी आणि त्याच्या सिद्धांताशी विरुद्ध वाटणारेआहेत. 

 एखादी पौराणिक गाथा असती तर त्याला आपणरचनाकाराची कल्पना किंवा एखाद्या गोष्टीचे सांकेतिक वर्णन मानले असते.कुठल्याही स्त्रीच्या पावित्र्याचा मापदंड तिच्या अग्निरोधीहोण्यातकसा असू शकतो ? असचं जर असतं तर सगळ्या पवित्र स्त्रियांनी  ‘अग्निरोधकअसलं पाहिजे पण हे कदापि शक्य नाही कारण पावित्र्य हे तुमच्या शरीरावरकुठलं ही अग्निरोधककवच चढवत नाही. 

   रामाच्या अशा वागण्याने कुठला आदर्शप्रस्थापित होतो, हे ही स्पष्ट होत नाही. या उलट असल्या वागण्याला आदर्शमानून कित्येक युगांपर्यंत स्त्रियांवर अत्याचारांचा कहर झाला. स्त्रीच्यापवित्र्याच्या परीक्षणाची असली अवधारणा वेद आणि मनुस्मृती  या दोन्हींच्याविरुद्ध आहे.

   हे तथ्य आहे कि रामायण एक ऐतिहासिक ग्रंथ आहे, अल्लादीनच्या जादुईचिरागासारखा एखादा किस्सा नाही. त्याबरोबर केवळ हिंदूंच्या भावनांशीचजुळलेला ग्रंथही नाही. राम एखाद्या विशिष्ट धर्मापुरतेच मर्यादित नसूनसंपूर्ण मनुष्य जातीचे आदर्श पुरुष आहेत. ते भारतीयत्वाचे प्रतिक आहेत. आणिम्हणून रामाला स्त्रीविरोधी भासविणाऱ्या ह्या प्रसंगामुळे संपूर्णहिंदुत्व, भारतदेश आणि भारतीयत्व अपमानित होते. 

    खरं काय? पाहूया : चलाहे कोडं सोडविण्याचा प्रयत्न करूया. वेदांप्रमाणे, रामायण ईश्वरी ग्रंथनसून ते एक महाकाव्य आहे. वेदांमध्ये त्यांची स्वतःची आपली रक्षण पध्दतीअसून ते त्यांच्या जन्मापासूनच जसेच्या तसे जोपासले गेले आहेत. त्यांच्यातकिंचितही बदल संभवत नाही. परंतु अन्य कुठल्याही ग्रंथांमध्ये असली रक्षणपद्धती उपलब्ध नाही आणि म्हणूनच नंतरच्या काळात त्यांच्यात भारीसंख्येत भेसळ करण्यात आली. रामायण, महाभारत आणि मनुस्मृती ही याची ठळकउदाहरणे  आहेत. 

   मुद्रणाच्या अविष्काराआधी, युगांपर्यंत ग्रंथहातांनी लिहिले जायचे आणि कंठस्थ करून लक्षात ठेवले जायचे. म्हणूनचत्यांच्यात भेसळ करणं फार सोपं होतं. यामुळेच या ग्रंथांचे शुद्ध संस्करणमिळणं कठीण आहे. सगळेच प्रक्षेपण (भेसळ) इतक्या सहजा – सहजी लक्षात येतनाही. परंतु, विश्लेषण केल्यावर झालेली भेसळ स्पष्ट दिसून येते. उदा.-भाषेत झालेला बदल, लिहण्याची वेगवेगळी पद्धत, कथेच्या प्रवाहाशी न जुळणारेप्रसंग, असंगती, संदर्भांविरुद्ध असणे, पूर्वापार संबंध न लागणे, कथेच्यामध्यात अचानकच एखादा चमत्कार होणे आणि कथा परत आपल्या गतीने सुरु होणे, ग्रंथाच्या मूळ विषयाला अनुसरून नसणे, इत्यादी.

    मनुस्मृतीत ५० टक्क्याहून अधिक भेसळ झालेली दिसते. (पहा-  http://agniveer.com/manu-smriti-and-shudras/). रामायणात सुद्धा अग्निपरीक्षेच्या श्लोकांचे विश्लेषण केले असता, थक्क करणारे पुष्कळ तथ्य समोर येतात. युद्धकांडापर्यंत कथेचा प्रवाह सामान्य आहे. यात हनुमान सीतेला रामाच्या विजयाची बातमीदेतो. सर्ग ११४ श्लोक २७, राम म्हणतात – स्त्रियांचा सन्मान, हा त्यांनाराष्ट्राकडून मिळणाऱ्या सन्मानाने आणि त्यांच्यासदाचारामुळे आहे.सन्मानाच्या रक्षणाकरिता त्यांच्यावर लादलेले बंधन – पडदा, घर, चार भिंतीतच डांबणे इत्यादी प्रकार मूर्खपणाचे आहेतयात हिंदूंचीस्त्रियांकरिता असलेली अवधारणा स्पष्ट होते. ह्या सर्गातला शेवटचा श्लोकसोडून, बाकीचे सर्व नंतर मिसळलेले वाटतात. त्यांच्यामुळेकथा थोडीही पुढे सरकत नाही.

    सर्ग ११५, पहिल्या ६ श्लोकांमध्ये रामशत्रुसंहाराचे भावपूर्ण वर्णन करतांना दिसतात. पुढील चार श्लोक हनुमान, सुग्रीव आणि विभीषण यांनी घेतलेल्या कष्टांना सांगणारे आहेत. यानंतरचेश्लोक ११ आणि १२ हे कथेला भटकावण्यासाठी टाकलेले दिसतात, म्हणून ते स्पष्ट भेसळ आहेत. श्लोक १३ आणि १४, सीतेला परत प्राप्त केल्यावर रामाचं  समाधान व्यक्त करणारे आहेत. 

   यासगळ्या परिदृश्याला पालटून, सर्ग ११५ चा श्लोक १५ अचानकच रामाकडून बोलवितोकी त्यांनी हे सगळं सीतेला प्राप्त करण्यासाठी केलेलं नाही. संपूर्णरामायणात राम सीतेच्या वियोगात अत्यंत दु:खीआहेत. आपण अश्रूंनी भरलेले त्यांचे डोळेही पाहतो. परंतू, हा श्लोक कथेलाअगदी वेगळ्या दिशेत घेऊन जाणारा आहे आणि हे पूर्वीच्या संदर्भांच्याविरुद्ध आहे. राम जर सीतेची अग्निपरीक्षाच घेऊ इच्छित होते, तर ते सरळपणेसांगता आलं असतं, त्यांना असं खोटं बोलायची आवश्यकता नव्हती. 

संपूर्णरामायणात राम एक सत्यवादी आणि सत्यशोधक म्हणून चित्रित आहेत आणि हा श्लोकत्यांच्या या स्वभावाला  चारित्र्याला दूषित करणारा आहे, स्पष्टच ही भेसळआहे. ह्या पुढील सर्ग ११५चे सर्व श्लोक भेसळच वाटतात. उदाहरण – श्लोक २२आणि २३ : राम सीतेला भरत, लक्ष्मण, सुग्रीव किंवा विभीषणाजवळ राहायलासांगतात. 

  सर्ग ११६, पूर्णपणे अशा नकली श्लोकांनी भरलेला आहे.इथे सीता रामाच्या आक्षेपांना उत्तर देते, लक्ष्मणाला चिता रचवायला सांगतेआणि अग्नीत प्रवेश करते. आता पर्यंत कुठेच नसलेले सगळे ऋषी,गंधर्व आणिदेवता अचानकच प्रकट होतात.

  सर्ग ११७ – सगळे प्रमुख देव रामाशी वार्ता करायलायेतात आणि हेच ते एकमात्र स्थळ आहे रामायणात, जिथे देवपण कथेवर हावी होते.इथेच रामाला परब्रह्मम्हंटल आहे, पण जर रामच परब्रह्म होते तरदुसऱ्या छोट्या देवांनी त्यांना समजवण्याची गरजच काय? आणि रामाने त्यांनाबोलावलेही कशाला? याचं काहीच उत्तर मिळत नाही. ह्याच सर्गात श्लोक ३२पर्यंत रामाची दैवी असल्याने स्तुती केलेली आहे. 

  सर्ग ११८ – अग्नीदेव सीतेला आपल्या मांडीवर घेऊनबाहेर येतात आणि तिला रामाला देतात. तेव्हा राम सांगतात की त्यांनी हासारा प्रपंच, सर्वांना सीतेच्या पावित्र्याची साक्ष देण्याकरिता केला होताआणि शेवटी श्लोक २२ म्हणतो, ‘राम सीतेशी अत्यंत सौख्याने भेटले‘.

  जर सर्ग ११५ श्लोक १५ पासून ते सर्ग ११८ श्लोक २२पर्यंतचे मधातले सर्व श्लोक काढून दिले तर कथा सुरळीत होऊन आपल्या सामान्यप्रवाहात वाह्ते. ही वार्ता असलेला हा सगळा प्रपंच अप्रासंगिक आहे. सर्ग११५ श्लोक १४ आठवा, जिथे रामाने सीतेला परत  प्राप्त करण्याचे वर्णन अगदीभावनावश होऊन केले होते आणि यापुढे सर्ग ११८ चा श्लोक २२ ठेवा – असंम्हणून राम सीतेशी अत्यंत सौख्याने भेटले.या दोन्ही तुटलेल्या कड्यांनाजोडून आणि मधातल्या नाटकी प्रसंगाला काढून कथा निरंतर होते आणि खरी कथाउभारून येते. 

  पुढचे सर्ग ११९ आणि १२० पूर्ण भेसळयुक्त आहेत. यांतदेवांनी रामाची आणखी स्तुती केली, राजा दशरथही इंद्रासोबत आले, त्यांचीलांब वार्ता झाली, इंद्राने चमत्काराने मेलेल्या सैनिकांना परत जिवंत केले, वगैरे आहे. 

  सर्ग १२१ म्हणतो राम त्या रात्री शांत झोपले आणिसकाळी विभीषणाशी त्यांनी चर्चा केलीबारीक-सारीक भेसळी सोबत कथा आपल्यास्वाभाविक गतीने पुढे जाते आणि  राम-सीतेचे अयोध्येला परतण्याचे वर्णनकरते. याच्यानंतर शेवटपर्यंत कुठलाही चमत्कार नाही.   

   ह्या प्रसंगाला आपण वर-वरून जरी पाहिले तरीही, ओळखतायेईल की ही नंतर केल्या गेलेली भेसळ आहे. यामुळे राम तर कलंकित झालेच पणभारतवर्षात विषारी वातावरणही निर्माण झाले – कित्येक संघटना, हिंदू विरोधीमानसिकता, स्त्री विरोधी मानसिकता, धर्मपरिवर्तन इत्यादी, पुष्कळ जटिलप्रश्न निर्माण झाले. ज्यांना कुठलाच आधार नाही, हे सगळंच संदिग्ध आहे.  

खाली दिलेले श्लोक स्पष्टतः भेसळ आहेत –

सर्ग ११४ – श्लोक २८चे पुढील सर्व, शेवटचा सोडून. 

सर्ग ११५ –  श्लोक १५चे पुढील सर्व.   

सर्ग ११६ आणि ११७  संपूर्ण. 

सर्ग ११८ – शेवटचा सोडून बाकीचे. 

सर्ग ११९ आणि १२० संपूर्ण. 

यांना काढल्यावर कथा अगदी सोपी, समजण्याजोगी आणि मुद्देसूद होते आणि कथेच्या प्रवाहातही खंड पडत नाही. 

शुद्ध रामायण आणि शुद्ध महाभारत : रामायण आणि महाभारताचे, हिंदूधर्माला अपमानित करणारे आणखी काही निर्मूळ प्रसंग-

रामायण : 

सीतेचे निर्वासन : हा प्रसंगही पूर्णपणे खोटा आहे.(संपूर्ण उत्तर रामायणचनंतरची काल्पनिक रचना असून, त्याचा वाल्मिकी रामायणाशी कुठलाही संबंधनाही.) 

 रामाने शंबूक शूद्राचा केलेला वध : हाही उत्तर रामायणातील आणखी एक खोटा प्रसंग आहे. 

 हनुमान, बालि, सुग्रीव इत्यादींना माकड किंवावानर समजणे. (हे सर्व मनुष्यच होते, हनुमान तर अतिश्रेष्ठ विद्वान, बुद्धिमान आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे स्वामी होते.) 

राम, लक्ष्मण, सीतेला व्यसनी आणि मांसाहारी समजणे. (मूळ रामायणात असा कुठलाच संदर्भ नाही.)

महाभारत :  

 पांचालदेशाच्या राजाची कन्या असल्याने द्रौपदी पांचाली होती, पाच नवऱ्यांमुळेनाही. (याउलट समजणारेसंस्कृत आणि इतिहास दोन्हींशी अनभिज्ञ आहेत.)  

श्रीकृष्णाच्या सोळा हजाराहून अधिक राण्या समजणे. (भारत देशाच्या अंधकाळात उपजलेली आणखी एक निर्मूळ कल्पना.)  

 शेकडो शताब्दींपासून, वेदांनंतर रामायण आणि महाभारत हेच हिंदूंचे प्रमुखग्रंथ असल्याने त्यांच्यात भेसळ करण्यात आली. यामुळे हिंदूंच्या मनातआपल्या धर्माविषयी हीन भावना निर्माण होते आणि मग ते त्याला दुरावतात.हिंदूना धर्मच्युत करण्यासाठीच मानव संविधानाचे पहिले ग्रंथ – मनुस्मृतीतहीभेसळ झाली. 

 सत्य पडताळण्याचे  मुख्य मापदंड हे आहे की तेवेदांच्या अनुकूल, तर्कंसंगत असावे, असं जर नसेल तर ती भेसळ्च समजण्यातयावी. तर्काविरुद्ध वाटत असलेल्या बारीक-सारीक गोष्टीत न अडकता, नेहमी मूळविषयाचे अनुसरण करावे. 

आमचा खरा धर्म हा एकमात्र वेदाचाच धर्म आहे आणिआमची संस्कृती ही त्याच सुदृढ पायावर उभारलेली आहे. राम हे संपूर्णविश्वासाठीच एक आदर्श आहेत, आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि याचा आम्हांलासार्थ अभिमान आहे. 

  रामाला एक धर्माचारी महापुरुष माना किंवा देव माना, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. पण रामचरित्र अत्यंत पवित्र, निखळ आणिउज्ज्वळ आहे, जसं खरं सोनं आणि आम्ही आपल्या आदर्श पुरुषांच्या सन्मानातसदैव प्रतिबद्ध आहोत. 

जय श्री राम।।

सन्दर्भश्रीमद्वाल्मीकीय रामायण, गीता प्रेस, गोरखपुर।

The 4 Vedas Complete (English)

The 4 Vedas Complete (English)

Buy Now
Print Friendly

More from Agniveer

 • ભાગ ૧: વૈદિક આત્મસહાયભાગ ૧: વૈદિક આત્મસહાય સનાતનનો અર્થ થાય છે શાશ્વત.. ધર્મ એટલે સ્વીકારવા કરવા યોગ્ય.છે તે. અને વેદ નો અર્થ થાય છે […]
 • زن – بنیاد دانش زن – بنیاد دانش Article in Persian on glory of woman! Who says women are inferior in status? Read this to know what first book of humanity- Divine Vedas- have to say about women! First Persian article on […]
 • Woman – Hallmark of true valorWoman – Hallmark of true valor Read what Vedas say about valor and potentials of woman! Unless we respect the woman, destiny will not respect us!
 • Still more ashamedStill more ashamed People now want to respect women. And government beats them up. Hence I am still more ashamed to be Indian.
 • Woman – Sunrise of enlightenmentWoman – Sunrise of enlightenment May the entire society respect and praise the glorious woman. She is the epitome of noble virtues, selflessness and worthy actions. She can destroy the strongest obstacles of hatred and […]
 • Woman – Foundation of knowledgeWoman – Foundation of knowledge Read to know what Vedas have to say about rights and potentials of women in matters of education, Yajna and Vedas. Respect woman to save the society.

Comments

 1. raj.hyd says

  maharshi valmiki ne apni ramayan ko yuddhkand me samapt kar diya tha 1 usme uttar kaand hi nhahi hai tab sita ki agnipariksha ka prashn hi kahaan uthata hai ? aur yah jo chitr jo bana hau hai vahii galat bana hai ! agar sita ki jki agni pariskah hui bhi hai to uska arth hai ki kathortam prashno ki pariksha li, jaise lohe ke channe chabana kya lohe ke chane hote hai hai ?

 2. Udaysingh Chavan says

  अग्नीवीर वर मराठी लेख लिहील्याबद्दल धन्यवाद……. असेच एक मराठी सदर वेबसाईट वर सुरू करावे व मराठी माणसां मध्ये वैदिक ज्ञानाचा प्रकाश करावा…… आपले पुन्हा एकदा आभार…….

 3. shankar says

  This is whole bunch of shit.you are glorifying rama who let the female to run over a fire.At the same time you cannot tolerate muslims polygamy adopted by mohammad;rape of disbelievers. How come the partiality?
  All religions are bullshit.
  see the mistake in your philosophy before pointing finger to non hindus..

 4. Akanksha says

  Agniveer Agni
  Tumache shabd fakt manat ghar nahi karat tar hrudayala sparsh karatat.. Shariramadhye chaitany sancharate ani sfuran chadhate. Atmik anandacha anubhaw karun dilyabaddal dhanyawad.
  Sister Aryabala, sundar marathi translation sathi tumachehi dhanyawad.

 5. ANAND says

  अग्नीवीरजी ,
  सर्व प्रथम मी आपले मनापासून धन्यवाद करतो की , आपण जन-जागृतीचे फार मोठे कार्य करात आहात आपल्या धर्मग्रंथांमध्ये वास्तविकता सोडून चमत्कार ला प्राधान्य दिले गेले मूळ ग्रंथात छेड़छाड़ करून त्यात खुप काही भेसळ झाली आहे मूळ ग्रंथांच्या वास्तविकतेला सोडून राम ,सीता ,कृष्ण देवांची ग्लानि केलेली आढळते, सीतेची अग्निपरीक्षा राम सारखे पुरूषोत्तमची अप्रत्यक्ष ग्लानि केलेली दिसते तसेच श्री कृष्णाच्या १६१०८ राणी व गोपिकांचे वस्रहरण,माखनचोर ह्या सारख्या वर्णनाने आजची पीढी वेगळा अर्थ काढ़ते तसेच इतर धर्म वाले सुद्धा त्याचा वेगळा अर्थ काढतात खरे पाहता मनुष्याने कसे इंद्रियवर सयम ठेऊन इन्द्रियजीत बनले पाहिजे व पुरूषोत्तम पुरुष म्हणजे काय त्याचे सुन्दर उदाहरण श्री राम आहेत तसेच श्री कृष्णने जरासंध पासून १६१०८ स्रीयांची मुक्ति करून त्यांना अभय दिले आपण मुख़्य गोष्टीनां विसरलो आहोत आज आम्हाला वेदांचे अध्ययन करायची खास गरज आहे आपण वेदावर मराठी मध्ये काही आर्टीकल पोस्ट करावेत ही ईच्छा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 characters available

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>